उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि राष्ट्रध्वजाला सलामी देऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय क्षेत्र सेनेच्या कॅडेट्सने राष्ट्रध्वजाला व मान्यवराना मानवंदना दिली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद शहरातुन प्रभात फेरी काढण्यात आली.

   याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाचा शुभ संदेश देताना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,आपण शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या संस्थेमध्ये गुरुदेव कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहोत. बापूजी केवळ शिक्षणमहर्षी , शिक्षणतज्ञ ,संस्थापक ,दलितमित्र होते असे नाही.तर ते स्वातंत्र्य सैनिक देखील होते.बापूजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भूमिगत राहून देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न केले.म्हणून केंद्र व राज्य शासनाने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून गौरवलेले आहे. प्रामाणिकपणे राष्ट्र उभारणीच्या कामात आपण योगदान देणे हीच खरी बापूजींच्या विचारांची पोहोचपावती आहे. असे ते म्हणाले.

   या कार्यक्रमासाठी सुशीलादेवी साळुंखे अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुलभा देशमुख ,डी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिंदे कार्यक्रमाधिकारी माधव उगिले, लेफ्टनंट केशव क्षीरसागर कार्यक्रमाधिकारी मोहन राठोड, आणि सर्व सर्व आजी-माजी गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार डॉ.वैभव आगळे यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.


 
Top