तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यात नुकत्याच झालेल्या पावसात मंगरुळ विभागात अतिवृष्टी होवुन पिकाचे शेतीचे अतोनात नुकसान  झाल्याने 

कृषी विभाग आणि महसूल विभागामार्फत मंगरूळ विभागातील  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरुवात झाली असुन  कृषी सहाय्यक नवनाथ आलमले,  मंडल अधिकारी श्री यादव ,तलाठी एस.के. श्री पाटील  पंचनामा करीत आहेत.  यावेळी   गिरीश डोंगरे,  चितरंजन सरडे, मकरंद लबडे, दीपक खोपडे, राहुल साठे, प्रसाद बचाटे उपस्थित होते.

 तुळजापूर तालुक्यात  विभाग निहाय  आजपर्यत  झालेला पाऊस, कंसात आजपर्यत झालेला पाऊस व टक्केवारी 

 तुळजापूर ४५.८०( ५६०.३० मिमि (१७५टक्के)

सलगरादिवटी ४९ मिमि (४१३.८०) मिमि (१३०टक्के)

सावरगाव ५०.८० (४३१.५० मिमि) (१३५टक्के )

मंगरुळ ६९.३० (४८०.७०मिमि) (१५०टक्के )

इटकळ ८ मिमि  (३९०.६९मिमि)( १२२टक्के )

जळकोट १२ मिमि (४२३.१९मिमि) (१३३टक्के)

नळदुर्ग  २३.८० ( ५१९.३०मिमि)( १६३टक्के )


 
Top