उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील सहायक संचालक,स्थानिक निधी लेखा परीक्षा, यांनी वित्त विभाग व भविष्य निर्वाह निधी विभाग,जिल्हा परिषद, या कार्यालयाचे  2020-2021 या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण केले आहे. हे लेखा परिक्षण  अहवाल तसेच यापूर्वीचे लेखा परिक्षण अहवाल नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहेत.

 या लेखा परिक्षण अहवाल जिल्हा परिषदेतील वित्त विभाग, या कार्यालयात सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश गं. केंद्रे यांनी कळविले आहे.


 
Top