उस्मानाबाद/प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कारगील विजय दिनानिमित्त आज 26 जुलै रोजी  उस्मानाबाद शहरातून भव्यदिव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.तेजस्वी सूर्या, प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हयामध्ये विविध ठिकाणी रॅली काढण्यात आल्या. या रॅलीत भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत माता की जयऽऽ, वंदे मातरम् , जय जवान जय किसान अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून गेले होते.

  शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौकापासून लेडीज क्लब, संत गाडगे महाराज चौक या मार्गावरुन ही रॅली काढण्यात आली.  येथील हुतात्मा स्मारकाजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. 

या रॅलीमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, धनंजय रणदिवे, इंद्रजित देवकते, राहुल काकडे, अभय इंगळे, विलास सांजेकर, प्रविण पाठक, बप्पा उंबरे, विनोद निंबाळकर, रमन जाधव, अभिजित काकडे, दाजीअप्पा पवार, लक्ष्मण माने, अमोलराजे निंबाळकर, संदिप इंगळे, अजय यादव, भाजयुमोचे जिल्हा पदाधिकारी अभिराम पाटील, ॲड.कुलदिप भोसले, प्रितम मुंडे, गीरीष पानसरे, रोहीत देशमुख, जगदिश जोशी, तालुकाध्यक्ष्र ओम नाईकवाडी, शहराध्यक्ष सुजित साळुंके, गणेश इंगळगी, प्रविन सिरसाठे, राहुल शिंदे, नरेन वाघमारे, मेसा जानराव, सतिष कदम, महेश बागल, प्रसाद मुंडे, विकास पवार, अमोल पेठे, सुनिल पंगुडवाले, उदय देशमुख, वैभव हंचाटे, सार्थक पाटील, अजय उंबरे, श्रीराम मुंबरे, बीन्नी तावसकर, काशिनाथ घोडके, बालाजी जाधव, ज्ञानेश्वर सुळ, शुभम कदम, संजय राठोड, यांच्यासह युवक व विद्यार्थी विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. 

 
Top