उमरगा / प्रतिनिधी-

 जकेकुर चौरस्त्या वरील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा अध्यक्षाने अर्धवट उड्डाण पुलावर चढून सोमवारी (दि२५) शोले सिनेस्टाईल आंदोलन केलं.

  राष्ट्रीय महामार्गावर इटकळ पासून तलमोड सिमेपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकाना त्रास होतं आहे. त्यामुळे मनसे तालुका विधानसभा अध्यक्ष शाहूराज माने यांनी हे रस्ते दुरुस्त करावेत या मागणीसाठी( दि२७) जुलै रोजी  आष्टामोड येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी रमेश काळे यांनी आमिष देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असल्याने हे आंदोलन तत्पूर्वीच केले गेले.

 सोमवारी जकेकूर - चौरस्ता येथील अर्धवट उंच पुलावर सकाळी 11 वा. चढुन आंदोलनास सुरुवात केली. सायंकाळी पाच च्या सुमारास  संबंधित अधिकाऱ्यांनी श्री. माने यांना लेखी आश्वासन दिल्याने माने हे अर्धवट पुलावर खाली आले. 

 लेखी दिलेल्या आश्वासनात म्हटले आहे की सहा महिन्यात चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, टोलनाका केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली येत असल्याने ते करता येणार नाही. महामार्ग कर्मचारी रमेश काळे यांच्या विरोधात तक्रारीचे पुरावे दिल्या त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक अनिल विपत, प्रोजेक्ट मॅनेजर अनिल के शर्मा, सिनियर मॅनेज, अजिंक्य महाडिक, पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, नायब तहसीलदार रतन काळे, सपोनी जाधवर आर.बी ,सपोनि.समाधान कवडे आदी उपस्थित होते. 

 
Top