नळदुर्ग / प्रतिनिधी-

 जकनीतांडा ते नळदुर्ग हा रस्ता अतीशय खराब झाला असुन या रस्त्यावरून नळदुर्गला येण्यासाठी येथील नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरुवातीच्या पावसानेच या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.  जकनीतांडा ते नळदुर्ग या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. 

 या रस्त्यावरून येताना येथील नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी होत आहे.  याठिकाणी बस येत नसल्याने तांड्यातील बहुतांश नागरीक हे नळदुर्गला पायी चालत येतात. ज्यांच्याकडे वाहन आहे तेच वाहनावरून येतात. मात्र रस्त्याची अशी दुरवस्था झाली असल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

 
Top