तुळजापूर/ प्रतिनिधी-

 श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी शक्ती पीठ ते तिर्थक्षेञ पंढरपूर  भक्ती पीठ या पायी  दिंडीचे  मंगळवार दिनांक ५ रोजी सकाळी ९ वाजता   विठ्ठल मंदिरातील श्रीविठ्ठल रखुमाई च्या मुर्तीचे व दिडींतील भगवे झेंडे  वाद्यांचे   पुजन माजी नगराध्यक्ष श्री प्रकाश   देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यानंतर महाआरती  होऊन ही पायीदिंडी तिर्थक्षेञ पंढरपूरला आषाडी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पायी टाळमृंदगाच्या गजरात रवाना झाली.

 शक्ती  पीठ ते भक्ती पीठ या पायी दिंडीचे १४ वे   वर्ष असून या दिंडीत साडेतीनशे   महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले आहेत. शनिवार दि.९ रोजी ही पायी दिंडी तिर्थक्षेञ  पंढरपूर या भक्ती पिठात  दाखल होणार आहे. या पायीदींडीचा सुमारे पाच दिवस   प्रवास असून पहिला मुक्काम काठी सावरगाव तसेच वडाळा लांबोटी मोहोळ या मार्गे जात दिंडी पंढरपूर येथे दिनांक 9 रोजी पोहोचणार आहे.

 या पायी दिंडीत अमर मगर , सुहास साळुंके, खंडू गवळी, लक्ष्मण भिसे,नाना हिबारे, सुदर्शन वाघमारे,आण्णा अमृतराव,गौरव साळुंके,राजाभाऊ चोपदार,दत्ता बेंद्रे,शिवा अमृतराव,सचिन कवठाळे यासह साडेतीनशे वारकरी सहभागी झाले आहेत.


 

 
Top