उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री येथे पथकास गोपनीय माहिती मिळाली की, ग्रामस्थ- राघु शाहु शिंदे यांनी अन्य दोन पुरुषांच्या मदतीने आपल्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा साठवला आहे. यावर पथकाने राघु शिंदे यांच्या घरी छापा टाकला असता पिशव्यांत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू व गुटखा असा 1,09,505 ₹ किंमतीचा माल बाळगलेले आढळले. यावर पथकाने नमूद माल जप्त करुन राघु शिंदे यांसह त्या दोन पुरुषांविरुध्द भा.दं.सं. कलम- 328, 272, 272, 188, 34 अंतर्गत उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदवला आहे.

  सदरची कामगीरी स्था.गु.शा. चे पोनि- श्री. रामेश्वर खनाळ, सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- हुसेन सय्यद, पोना- अमोल चव्हाण, शैला टेळे, रविंद्र आरसेवाड, विजय घुगे, सहाणे, अरब यांच्या पथकाने केली आहे. 


 
Top