उस्मानाबाद / प्रतिनिधी जिल्ह्यातील नावलौकिकप्राप्त श्री अकॅडमीच्या यशवंत-गुणवंतांचा गौरव  करण्यात आला़.उस्मानाबाद येथे श्री अकॅडमीच्या मुख्य सेंटरमध्ये पहिला वर्धापनदिन रविवारी (दि़.२४) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उस्मानाबाद येथील सुप्रसिध्द श्री अकॅडमीचा प्रथम वर्धापनदिन रविवारी मोठ्या सोहळ्यात साजरा करण्यात आला़. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सदस्य श्रीराम वनवे, कार्यक्रमाचे संयोजक तथा श्री अकॅडमीचे संस्थापक प्रा़ शहाजी माळी, प्रा़मिथिलेश दिक्षीत, प्रा़ बाजीराव जाधवर, प्रा़ सारीका काळे, मैदानी प्रशिक्षक प्रा़ अमर टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती़. प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री अ‍ॅकडमीचे पोलीस प्रशासनात भरती झालेले विद्यार्थी महेश वाघे, राजकुमार दळवी यांचा सत्कार करण्यात आला़ .श्री अकॅडमीला विद्यार्थ्यांचा पहिल्याच वर्षात मोठा प्रतिसाद लाभला़ .स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षणासाठी तब्बल १३० विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रवेशपात्र ठरले आहेत़. या सोहळ्यास विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठी उपस्थिती होती़. सुत्रसंचालन प्रा़. जाधवर तर आभार प्रा़. दिक्षीत यांनी व्यक्त केले.

 
Top