तेर/ प्रतिनिधी-

कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचे कृषी संचालक  दशरथ तांबाळे यांनी वानेवाडी तालुका उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीत विविध नाविन्यपूर्ण प्रयोगकरुन उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले. प्रगतशील शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे यांनी बनविलेल्या सोयाबीन पेरणी करताना रासायनिक खतासह जीवामृत  पेरणी करण्यासाठी बनविलेल्या पेरणी यंत्राची पाहणी केली व या उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी त्यांनी बीबीएफ व टोकण  यंत्राद्वारे सोयबीन पेरणी केलेल्या प्रदीप घेवारे ,दीपक घेवारे,शत्रुघ्न उंबरे, यांच्या शेतास भेट देऊन पाहणी केली व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली .शेतकऱ्यांनी  75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याकडे पावसाचा खंड पडल्यास  संरक्षित पाण्याची सोय आहे त्याच शेतकर्‍यांनी पेरणी करावी असे आवाहन केले.

 यावेळी निती आयोग आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत अनुदानावरील बीबीए पेरणी यंत्राचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर, प्रकल्प संचालक ( आत्मा ) जितेंद्र शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार,प्रकल्प उपसंचालक ( आत्मा ) बालाजी किरवले, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव,मंडळ कृषी अधिकारी सत्यजित देशमुख ,कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय मोहिते ,कृषी सहाय्यक वैभव लेनेकर ,कृषी मित्र  शिवराज घेवारे, उपसरपंच गोविंद उंबरे, प्रगतशील शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे ,सतीश खडके, वैभव उंबरे ,सुभाष हिंगमीरे, पांडुरंग उंबरे, संजय उंबरे, गणपती चव्हाण, अगरचंद पौळ, महादेव कदम, नारद उंबरे ,भगवंत वाघमारे ,श्रीशैल्य केसकर, दत्तात्रय कदम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 
Top