उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पालकांच्या तक्रारी वरुन मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी विद्यामाता हायस्कूल येथे जाऊन शालेय साहित्य विक्री करत असलेला व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर शाळेतील पुस्तके,वह्या,गणवेश विक्री बंद करून गट शिक्षण अधिकारी संजीव बागलसाहेब यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती.

प्राप्त तक्रारीची   दखल घेत  गट शिक्षण अधिकारी संजीव बागल, विस्तार अधिकारी हाके मॅडम यांनी शाळेत जाऊन पुस्तके विक्री करत असलेल्या ठिकाणाची पाहणी करून शाळेला लेखी स्वरूपाची मागणी केली तसेच शाळेवर योग्य ती कडक कारवाई कली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, विद्यार्थी सेनेचे पृथ्वीराज शिंदे आदी उपस्थित होते..


 
Top