वाशी / प्रतिनिधी-

सध्या शेतीमधील पेरणीपूर्वी असणारी सर्व मशागतीची कामे संपलेली असून जगाचा पोशिंदा शेतकरी राजा वरुणराजाची प्रतीक्षा करत आहे खते आणि बियाण्याची जुळवाजुळव करण्यात शेतकरी मग्न आहे तेव्हा वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावीत आशा या आशयाचे निवेदन काँग्रेस च्या वतीने वाशी तहसील मधील डी पी गायकवाड यांना देण्यात आली आहे.

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की तालुक्यातील परवानाधारक खत व बी बियाणे विक्रेते कृत्रिम टंचाईच्या निर्माण करून शेतकरी राजाची फार मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करत असतात त्यावर उपाय म्हणून प्रत्येक परवानाधारक विक्री त्याला उपलब्ध खते व बी-बियाणे साठा विक्री आणि शिल्लक असा नामफलक दुकानासमोर लावण्याची सक्ती करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस श्री शामराव भोसले वाशी तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब गपाट मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष नथुराम गायकवाड ओबीसी सेलचे अध्यक्ष अमोल बोडके काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष शेषराव गाडे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमर तागडे रमेश गपाट अक्षय जावळे जाफर शेख आदीचे सह्या आहेत यावेळी  पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते


 
Top