उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील सारोळा (बुद्रुक  ) येथे पुण्यश्लोक- राजमाता अहिल्यादेवी होळकर  यांची जयंती  विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राज्याचे माजी कृषी, उद्योग राज्यमंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह ( दादा ) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सव सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी व पं. स .सदस्य सुरेश (भाऊ) देवगिरे यांची उपस्थिती होती.   सारोळा येथे रविवारी ( दि.५) सकाळी  छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीचे पूजन आमदार राणादादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास पत्रकार धनंजय रणदिवे, ज्येष्ठ नेते गौतम बाकले, शशिकांत परीट, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर देवगिरे, सोसायटीचे संचालक अमर बाकले, पांडुरंग कुदळे श्री अकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ. बाजीराव जाधवर, सोमनाथ कठारे, प्रदीप वाघ आदी पदाधिकारी , कार्यकर्ते,   धनगर समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विजयाच्या, जयजयकराच्या घोषणा देण्यात आल्या.


 
Top