उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले पोस्टाचे उस्मानाबाद विभागिय कार्यालय उस्मानाबादला परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भारतीय डाक कर्मचारी महासंघाचे श्री प्रकाश कुलकर्णी यांनी दिले. उस्मानाबाद येथे भारतीय डाक कर्मचारी महासंघाच्या बैठकीत ते आज रविवारी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष श्री विजय दहिफळे सहसचिव सचिन रोकडे उस्मानाबाद अध्यक्ष श्री विठ्ठल गोवर्धन उपस्थित होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर हे कार्यालय लातूरला स्थलांतरीत करण्यात आले होते. 

यावेळी बोलताना श्री कुलकर्णी म्हणाले की ग्रामीण पोस्टल कर्मचाऱ्यांच्या यासाठी तसेच पोस्टल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच पोस्टल कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी भारतीय डाक कर्मचारी महासंघाचे काम करावे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पोस्टल कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी भारतीय डाक कर्मचारी महासंघ सातत्याने प्रयत्न करत असून त्यात यश येत आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील पोस्ट कर्मचाऱ्यांनी कसलेही दडपण मनावर न ठेवता भारतीय डाक कर्मचारी महासंघाचे कार्य करावे.

यावेळी उस्मानाबाद भारतीय डाक कर्मचारी महासंघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी श्रीव्ही व्ही  गोवर्धन तर उपाध्यक्षपदी श्रीमती एन एन भाटे आणि श्री डी बी  घोडके यांची आणि सचिव पदी श्री पी बी तोडकर यांची निवड करण्यात आली.

तर एस एस कुलकर्णी उपसचिव म्हणून तर श्रीमती सी ए बारगजे , एस एस पाठक , श्री एस एन  कुदळे , श्री एस के जाधव यांची सहसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. खजिनदार म्हणून ए के शितोळे , तपासणीस म्हणून एस एम हावळे संघटन सचिव म्हणून व्ही आर  कुंभारे , श्रीमती आर व्ही मेलघाले , श्रीमती काटकर ,  श्री बी एस मिरगणे यांची निवड करण्यात आली.


 
Top