परांडा / प्रतिनिधी : -

 महाविद्यालयाच्या काम काजासाठी व कार्यालयीन कागदपत्रे साठवणीसाठी तसेच त्या कागदपत्रांच्या  आदान प्रदान करण्यासाठी  ओपन सोर्स   सॉफ्टवेअर म्हणून D Space या अज्ञावलीचा मोठ्या प्रमाणात ग्रंथालयांमध्ये उपयोग केला जातो असे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे के आर सी  विभागाचे संचालक डॉ धर्मराज वीर यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये व्यक्त केले. या कार्यशाळेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.

 यावेळी उद्घाटन प्रसंगी अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील सोफ्टेक सोल्युशन अंड सर्विसेस पुणे या कंपनीचे संचालक प्रा चेतन टाकसाळे व टेक्निशियन प्रा इद्रीस खान  ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख तसेच आय क्यु ए सी चेअरमन डॉ महेशकुमार माने  महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे व्यासपीठावर उपस्थित होते. हाऊ टू क्रीएट इन्स्टीटयुशनल  रेपॉजिटरी बाय युजिंग डि स्पेस या विषयावर  महाविद्यालयातील आय क्यू ए सी आणि ग्रंथालय विभाग तसेच सोफ्टेच सोल्युशनस अंड सर्विसेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते  . या कार्यशाळेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून विविध महाविद्यालयाचे ग्रंथपाल  आणि ग्रंथालय विभागात संशोधन करणारे  संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख यांनी केले .यावेळी सर्व मान्यवरांचा शाल बुके व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी प्रा चेतन टाकसाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .ते आपल्या मनोगतात म्हणाले की ग्रामीण ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी या डी स्पेसचा मोठ्या प्रमाणात वापर करावा .उद्घाटन प्रसंगी डॉक्टर धर्मराज म्हणाले की मी अनेक राज्यांमध्ये अनेक महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत परंतु या महाविद्यालयाने कार्यालयीन कामकाज व ग्रंथालयाचे कामकाज पाहता एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि त्याचेच फलित म्हणून या महाविद्यालयास नॅक  समितीचा अ दर्जा प्राप्त झाला आहे हे कौतुकास्पद आहे .यावेळी सहभागी झालेल्या सर्व ग्रंथपाल आणि संशोधक यांना डि स्पेस सॉफ्टवेअरचे  प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यशाळेत एकूण ३० ग्रंथपाल व संशोधक यांनी नोंदणी केली होती .अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ दीपा सावळे म्हणाले की या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी व महाविद्यालयाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात .संस्था सचिव संजय निंबाळकर यांच्या प्रोत्साहनामुळे मी माझ्या सगळ्या कर्मचार्याना  विश्वासात घेऊन अनेक  कार्यशाळा , वेबिनार , राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस आयोजित केले आहेत   प्राध्यापकांना संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे त्यामुळे अनेक प्राध्यापकांनी आपापल्या विभागात उल्लेखनीय कार्य केले आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले तर  सकाळच्या सत्रामध्ये आभार प्रा डॉ  विद्याधर नलवडे यांनी मानले .दुसऱ्या सत्रामध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज च्या ग्रंथपाल डॉ गुंजाळ सुनिता यांचे खोपा हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे त्यांचा बुके ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.आणि त्यानंतर सॉफ्टवेअर च्या संदर्भात चर्चा करण्यात आली.शेवटी प्रा डॉ प्रकाश सरवदे यांनी आभार  मानले.

 
Top