उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज उस्मानाबाद पर्यटन विकास समितीच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या (बारवाची ) पाणवठ्याची  स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता, तसेच या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

 उस्मानाबाद पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी सुरुवातीला उपस्थित सर्वांना या ठिकाणाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असलेल्या या ठिकाणी रामायण कालीन श्रीरामाचे पदस्पर्शाने पावन झाल्याची अख्यायिका ही त्यांनी सांगून उस्मानाबाद च्या पर्यटनाच्या दृष्टीने हे ठिकाण ही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. व ग्रामस्थांनी देखील आपल्या गावातील या महत्त्वाच्या ठिकाणाचे पावित्र्य व स्वच्छता राखून इथे येणाऱ्या पर्यटकांचे व भाविकांचे आदरातिथ्य करून माहिती सांगण्याचे आवाहन केले.

   या निमित्ताने उस्मानाबाद जिल्हा पर्यटन विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चोराखळी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या पाणी साठवण्याच्या पानवठा (बारव ) मधील जमा झालेल्या शेवाळी वनस्पती व निर्माल्य आदी बाहेर काढून स्वच्छ करण्यात आले. तसेच या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली आणि  वृक्षारोपण देखिल करण्यात आले. 

यावेळी उस्मानाबाद पर्यटन विकास समितीचे रणजित रणदिवे, गणेश वाघमारे,शेषनाथ वाघ,बाबा गुळीग, अब्दुल लतीफ, ॲड.कुलदिपसिंह भोसले,भागवत घेवारे, राजेंद्र परदेशी, श्रीराम मुंबरे,विजय गायकवाड,किणी येथील कृषी महाविद्यालयचे विद्यार्थी आदींनी उपस्थित राहून श्रमदान केले. सरपंच खंडू मैंदाड, ग्रा.पं.सदस्य ॲड.रविंद्र मैंदाड, दिलीप गुरव, ग्रामसेवक व काही ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य केले. समितीचे सचिव देविदास पाठक यांनी पुढील रुपरेषा सांगून स्वच्छता अभियान मधे श्रमदान करणा-या सर्वांचे आभार मानले.


 
Top