उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उंडेगाव येथील सीमाबाई शेरे यांच्या बंद घराचे १२ ते १७ जून दरम्यान कुलुप तोडून ४० किलो गहू, २५ किलो ज्वारी भरून ठेवलेल्या धान्याच्या पिशव्या चोरून नेल्या होत्या. शेरे यांनी अंबी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. अंबीचे एपीआय आशिष खांडेकर, पोलिस नाईक सिध्देश्वर शिंदे, सम्राट माने, पोलिस कॉन्स्टेबल सतीश राऊत, राहूल गायकवाड यांच्या पथकाने सुनील अरविंद शेरे, प्रवीण भक्तीदास शेरे यांना ताब्यात घेत चोरीचे धान्य जप्त केले.


 
Top