तुळजापूर / प्रतिनिधी : -
श्री. सतीश शिवणे यांची सहआयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे नियुक्ती झालेली असून त्यांनी पदभार घेण्यापूर्वी मंगळवार दि३१रोजी प्रथमता श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
त्यानंतर तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी पालिकेत सत्कार केला. सदर प्रसंगी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सतिश शिवणे यांनी सांगितले की, माझीजन्मभूमी तिर्थक्षेञ तुळजापूर असुन त्यामुळे मी माझा जन्मभूमीचा विकासासाठी विशेष लक्ष देणार आहे.
जिल्हा प्रशासन आपल्या पालिकेला पूर्ण सहकार्य करेल,असेही सांगितले. तत्पूर्वी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही मंदिर कार्यालयात श्री.सतिश शिवणे यांचा सत्कार केला. नगरपरिषदे मधे सत्कारा प्रसंगी श्री.रणजीत कांबळे कर निर्धारण, श्री.सुशिल सोनकांबळे, विद्युत अभियंता, श्री.शिवरत्न अतकरे कर निर्धारण, श्री.अशोक सनगले नगर अभियंता,श्री.ज्ञानू टिंगरे, श्री.दत्ता साळूंके, श्री.सज्जन गायकवाड, श्रीम.बरुरकर प्रफुल्लता इ.उपस्थित होते. कार्यालय अधीक्षक वैभव पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.