उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील चिखली येथे अखंड हरिनाम सप्ताह ,ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची रविवारी (दि. 15 )काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

 चिखली येथे शांतिब्रह्म हभप नवनाथ महाराज यांनी स्वखर्चाने स्वतःच्या शेतामध्ये श्री विठ्ठल रखुमाई संतश्रेष्ठ जगद्गुगुरू श्रीमंत श्री तुकोबराया ,संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबाराया यांचे भव्य- दिव्य मंदिर उभारले आहे. या मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. रविवारी  सप्ताह सोहळ्याचे आयोजक ,शांतिब्रह्म हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांचे काल्याचे किर्तन  झाले .त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .या किर्तन सोहळ्यासाठी चिखली ,दारफळ ,राजुरी ,सारोळा आदी पंचक्रोशीतील भाविक -भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top