उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महात्मा बसवेश्वर मध्यवर्तीय जयंती उत्सव समितीच्या वतीने उस्मानबाद शहरात सेंट्रल बिल्डींग जवळीस महात्मा बसवेश्वर चौकात सकाळी 11:30 वाजता प्रतिमा पुजन व आमदार निधीतुन चौकाचे शुशोभिकरणाचे उद्धघाटन मा.श्री.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,नगरध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

तसेच शासकीय स्त्री रूग्नालय उस्मानाबाद येथे अक्षय तृतीयाच्या मुहर्तावर जन्मलेल्या बालकास बेबी किट वाटप,सायंकाळी 5 वाजता संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे मुलांचे वारकरी व महिला भजनी मंडळांचे पथक,व भव्य मिरवणुकीचे उदघाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील,मा.श्री शरण बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात येणार आहे.तसेच सर्व येणार्या भाविक भक्तांना अल्पउपहाराचे  आयोजन करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रविण शेटे यांनी केले आहे.

 
Top