उस्मानाबाद / प्रतिनिधी-

घाटंग्री शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दरवाजाच्या ९० ते १०० कि.ग्रॅ. वजनाच्या १२ लोखंडी पाट्या २३ एप्रिल ते ११ मे दरम्यान चोरल्या होत्या. याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन तिघांना जेरबंद केले.

या प्रकरणी शाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग - रावसाहेब पिंपळे यांनी सरकारतर्फे उस्मानाबाद (ग्रा.) येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंद झाल्यावर गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- शैलेश पवार, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ- योगेश कोळी, पठाण यांच्या पथकाने गतीमान तपास केला. यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साठे चौक, उस्मानाबाद येथील कैलास सिताराम पारडे, वय ४५ वर्षे यांसह अन्य दोघांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीच्या मालासह गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त करुन त्यांच्या उर्वरीत साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- शैलेश पवार, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ- योगेश कोळी, पठाण यांच्या पथकाने गतीमान तपास केला. यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साठे चौक, उस्मानाबाद येथील कैलास सिताराम पारडे, वय ४५ वर्षे यांसह अन्य दोघांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीच्या मालासह गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त करुन त्यांच्या उर्वरीत साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

 
Top