उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे गावचे सुपुत्र व सध्या कोल्हापूरला न्यू कॉलेजात वनस्पती शास्त्र प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ विनोद भिमराव शिंपले यांची  मुंबई येथील गिरगाव चौपाटीवरील नामवंत कॉलेज म्हणजे विल्सन कॉलेज मध्ये नुकतीच पाच वर्षासाठी     वनस्पती शास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती झाल्याचे पत्र त्यांना आज प्राप्त झाले. 

सदर नियक्ती अंतर्गत विविध वर्गाचे अभ्यासक्रम तयार करणे, विभागातील प्राध्यापकांचे प्रमोशन साठी विषयतज्ञ म्हंणून उपस्थित राहणे अशी कार्य डॉ शिंपले यांना करावी लागणार आहेत. सदर नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी असून या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

 
Top