उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर आणि एन साई मल्टीस्टेट सोसायटीकडून अर्थसाह्य घेऊन ऊसतोडणी यंत्र खरेदी केलेल्या उत्रेश्वर चंद्रकांत जाधवर या शेतकऱ्यांने आपली फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी दि.11 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु आज त्यांची प्रकृती ढासाळली असल्यामुळे   डॉक्टरांच्या टीमकडून त्यंाची तपासणी करण्यात आली.  जिल्हा प्रशासन शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे सातव्या दिवशी ही दुर्लक्ष करीत असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

 संबंधित प्रशासनाचे या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्याने आज या उपाषेणकर्त्यां शेतकऱ्यांची प्रकृती ढासाळली आहे. दरम्यान डॉक्टरांच्या टीमने आंदोलन स्थळी येऊन उपाेषणकर्ते शेतकरी उत्रेश्वर जाधवरची तपासणी केली.  या प्रकरणात कारखाना व्यवस्थापनाची चौकशी करण्यात यावी, तसेच आपण स्वतः दोषी आढळल्यास माझ्यावरही कार्यवाही करण्यात यावी, अशी प्रांजळ भावना व्यक्त करुन कारखाना आणि मल्टीस्टेटच्या जाचातून मुक्तता करावी, अशी मागणी जाधवर करत आहेत. 

 
Top