उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उजनी जलाशयातून उस्मानाबाद शहरास पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली.भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांना तात्काळ उपाय योजना बाबत कारवाई करण्याबाबत सूचना केल्या 

उस्मानाबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.यलगट्टे यांना फोन करून पाणी वाया जाऊ नये यासाठी पंप हाऊस मधून पाणी बंद करणे, पाईप लाईन तत्काळ दुरुस्त करणे व तात्पुरत्या स्वरूपात इतर स्त्रोतातून शहरास पाणी पुरवठा चालू ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत.

आज दिनांक २२ मे रोजी चिखर्डे गावानजीक ही जलवाहिनी फुटल्याचे श्री.पल्लव गाढवे यांनी निदर्शनास आणून दिले. ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे समजताच संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. शहरात पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत देखील निर्देश देण्यात आले.

  याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक येलगट्टे यांना संपर्क साधला असता त्यांनी बांधकाम विभागाने त्यांचे काम करत असताना पाईपलाईन फुटली असल्याचे माहिती दिली

 
Top