उस्मानाबाद / प्रतिनिधी-

२०२० पीक विमा संदर्भात उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर विमा कंपनीचा फायदा व्हावा, यासाठी एजंटगिरी केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. खासदार-आमदारा सारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने बोलने आपेक्षीत आहे, अशी टीका भाजपचे दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली. 

भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस अॅड. अनिल काळे, अॅड.नितीन भोसले, सतीश दंडनाईक, दत्ता देवळकर, अनंद कंदले, संतोष बोबडे, राहुल पाटील आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती देताना दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले की, ज्या वेळेस भाजपने दाखल केलेल्या याचिकेची सुनवाणी सुरू झाली. त्याचवेळेस विरोधकांच्या वकिलाने आम्ही दाखल केलेल्या याचिकेची ही सुनावणी एकत्रीत घ्यावी, अशी मागणी केली. एकत्रित सुनावणी झाली असताना एजंटगिरी कोणी केली असा प्रश्न उपस्थित करून दत्ता कुलकर्णी यांनी साडेतीन लाख शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम मिळणार म्हणून विरोध नाराज आहेत का ? असाही प्रश्न विचारला. गुत्तेदारी, कमिशनखोरी, एजंटगिरी ही भाजपची संस्कृती नाही, अशी टिका करत आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक काम केले. त्यामुळे आम्हाला आनंद झाला, असेही त्यांनी सांगितले. विरोधक मात्र सरकार त्यांचे असताना देखील त्यांना न्यायालयात जावे लागते, असे सांगून पीक विमा कंपनीवर दबाव आणून विमा रक्कम देण्यास भाग पाडावे, शेतकऱ्यांच्या पीकविमा संदर्भात राजकारण करू नये असे ही दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले. 


 
Top