उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हयातील सर्व देशी,विदेशी मद्य विक्री दुकाने व परवानाकक्ष एफएलविआर-2 , बिअरशॉपी, संबंधित अनुज्ञप्तीधारक यांना यात्रा महोत्सव आणि सणांनिमित्त दारूबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. बंदीच्या काळात अवैध मद्य विक्री निदर्शनास आल्यास संबंधितांवर मुंबई मद्य निषेध कायदा 1949 निर्दिशित केल्याप्रमाणे गुन्हे नोंदवले जातील . असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज जारी केले आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे दिनांक 24 एप्रिल ते 5मे या कालावधीत श्री.गोरोबा काकांचा समाधी सोहळा तथा पुण्यतिथी यात्रा महोत्सव साजरा होणार आहे. श्री.गोरोबा काका मंदिर परिसरातील आणि तेर गावातील सर्व देशी विदेशी दारु दुकाने तसेच बिअरबार,परमिटरुम दि. 28 एप्रिल 2022 या दिवशी अनुज्ञप्तीवरील व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत.

परांडा तालुक्यातील सोनारी येथे श्री.काळभैरवनाथ यात्रा उत्सव साजरा होणार आहे. श्री. काळभैरवनाथ मंदिर परिसरातील आणि सोनारी गावातील सर्व देशी आणि विदेशी दारु दुकाने व बिअरबार,परमिटरुम दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी अनुज्ञप्तीवरील व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत.

दिनांक 03 मे 2022 रोजी रमजान ईद ( ईद- उल फित्र ) हा सण साजरा होणार आहे.या दिवशी जिल्हयात अनुचित प्रकार घडु नये म्हणून जिल्हयातील सर्व प्रकारच्या देशी, विदेशी दारु दुकाने आणि बिअरबार,परमिटरुम संपूर्ण उस्मानाबाद जिल्हयातील सर्व प्रकारच्या अनुज्ञप्तींवरील व्यवहार बंद ठेवण्यात यावेत, असेही या आदेशात म्हटले आहे.


 
Top