उस्मानाबाद / प्रतिनिधी-

यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद  उस्मानाबाद येथे दिनांक 18 एप्रिल  रोजी उद्योग कर्ज मेळावा पार पडला. या मेळाव्या करिता  26 बँकांचे मॅनेजर व लीड बँक मॅनेजर विजयकर  सर तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे  व इतर पदाधिकारी उपस्थित होते, या मेळाव्यासाठी लोकानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 119 अर्जदार म्हणजेच लाभार्थी या मेळाव्यास उपस्थित होते .

या मेळाव्याच्या माध्यमातून दादांच्या संकल्पनेतून आपल्या तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये नवीन उद्योजक निर्माण व्हावेत याकरिता शासनाच्या योजना पीएमईजीपी व इतर योजना राबविण्यात येत आहेत. सुरुवातीची शासकीय प्रक्रिया म्हणजे फाईल जिल्हा उद्योग केंद्रातून मंजूर करून  जिल्ह्यांमधून सातशे प्रकरण आपण मंजूर करून घेतले आहेत. त्याच बरोबर जी प्रकरणे बँकांमध्ये प्रलंबित आहेत त्यापैकी सर्वसाधारणपणे 250 फाइल्स या उस्मानाबाद तालुक्यामधील आहेत. या सभेला तालुक्यामधील 28 बँकेपैकी 26 बँकांचे प्रतिनिधी हजर होते आणि 250 लाभार्थ्यांपैकी 119 लाभार्थी उपस्थित होते. ही प्रकरणे मंजूर करण्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत या संदर्भात सर्व बँक प्रतिनिधीं बरोबर सविस्तर चर्चा झाली. त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी असे आवाहन केले की, बँकांना प्रकरण लवकरात लवकर मंजूर करावेत. या संदर्भात बँकांनी सुद्धा विनंती केली की सर्वसाधारण एखाद्या प्रकरणासाठी उद्योग उभारण्यात उभारणी केल्यानंतर कर्ज मंजूर झाल्यानंतर कच्चामाल घेणे व पक्का माल विक्री केल्या नंतर फायदा किती राहतो आणि बँकांचे कर्ज कसे फेडणार याची संपूर्ण माहिती कर्जदाराला असणे आवश्यक आहे कारण काही माहिती नसेल आणि उद्योग उभा करेल तर तो उद्योग व्यवस्थितपणे चालणार नाही. याकरिता नवीन जे उद्योजक आहेत त्यांना याची संपूर्ण व सखोल माहिती असावी. त्यानंतर दुसरा प्रश्न बँकांनी उपस्थित केला तो म्हणजे त्यांचं सिबिल हे सातशे च्या पुढे असाव. आणि तिसरी गोष्ट बँकांनी उपस्थित केली की त्यांनी जी काय कागदपत्र आहेत ती संपूर्ण बँकेच्या नियमाप्रमाणे बँकांमध्ये दाखल करावीत. या गोष्टींची 100% पूर्तता केल्यावर त्यांनी हमी दिली की आम्ही शंभर टक्के तुमची प्रकरणे मंजूर करू दादांनी व नितीन काळे साहेबांनी आव्हान केले की सुशिक्षित बेरोजगारांची संख्या विचारात घेता आपला जिल्हा आत्मनिर्भर बनणं आवश्यक आहे त्याकरिता सर्वांनी मिळून सहकार्य करणे आवश्यक आहे. म्हणजे बँकांनी जर कर्ज प्रकरणे लवकरात लवकर मंजूर केली तर बऱ्याच लोकांचे प्रश्न सुटतील त्यामुळे बँकांना दादांनी आव्हान केले आहे की लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावावेत व सहकार्य करावे.


 
Top