उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोंड (ता. उस्मानाबाद) येथील ताईचा मळा या नावाने परिचीत असलेल्या भागाचे कुशीनगर असे नामांतर करून गुरूवारी दि 14 रोजी नामफलकाचे उदघाटन कोंड गावचे उपसरपंच अँड रामेश्वर शेटे यांच्या शुभहस्ते  उत्साहात करण्यात आले.

      कोंड गावापासुन तीन कि.मी  कोंड – भेटा रस्त्यावर  ताईचा मळा म्हणुन हा भाग परिचीत होता या भागाचे कुशीनगर असे नामांतर करावे म्हणुन सामाजिक कार्यकर्ते सतिश जाधव व ग्रामस्थांनी कोंड ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. याबाबत ग्रामपंचायतीने सभा घेऊन ताईचा मळा या भागाचे कुशीनगर करण्याचा ठराव घेतला व  तो सभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला होता. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधुन कुशीनगर नामफलकाचे उदघाटन करण्यात आले  यावेळी ग्रामसेवक एल.ई. सुरवसे, ग्रा.पं सदस्य मधुकर रोडगे, दत्ता जाधव, शिवाजी सर्जे, केशव भंडे, लिंबराज घोडके, अनिल सरवदे, गोपाळ सर्जे, किशोर सर्जे, महावीर जाधव, टारझन जाधव, आनंद जाधव, लखन चिलवंत, लखन जाधव, लिंबराज जाधव, गंगाधर जाधव, दिगंबर जाधव, दत्ताञय जाधव, शंकर पांचाळ मुरूडचे ग्रा.पं सदस्य संतोष काळे, महावितरणचे सुनिल कांबळे यांच्यासह ग्रामस्थांची मोठया संख्यने उपस्थिीती होती  ग्रामपंचायतीने  या भागाचे कुशीनगर केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोरो इंडियाचे समन्वयक सतिश जाधव यांनी परिश्रम घेतले.


 
Top