उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनमित्त सिटी मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लाइफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उस्मानाबादच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरात 250 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना मोफत सॅनिटायझर, हॅन्डवॉश व महिला रुग्णांना सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले.

शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन या शिबिराचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकबर पठाण, अजीम शेख, नीलेश प्रधान, झीनत प्रधान, अरबाज पठाण, गणेश वाघमारे व इतर उपस्थित होते.या शिबिराला तुळजापूर-उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबवित असल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.

शिबिरात डॉ.विश्वजित वाकडे, डॉ.एजाज सय्यद, डॉ. समीर सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करुन व औषधोपचार करुन गरजूंना वैद्यकीय सल्ला दिला. त्यांना हॉस्पिटलचे कर्मचारी निलोफर तांबोळी, अभिषेक पुकाळे, शाहबाझ शेख यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने, बाबासाहेब बनसोडे, धनंजय वाघमारे, प्रविण जगताप यांनी परिश्रम घेतले.


 
Top