उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संवैधानिक पदावर बसलेल्या कांही लोकांना पद आणि अधिकार यांचे तारतम्य नाही, अशी घणाघाती िटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता केली. 

 उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी (आ) येथील कार्यक्रमात ते रविवारी (िद.६) बोलत होते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला राष्ट्रवादी  काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर , आमदार विक्रम काळे, राहुल मोटे, संजय दौंड यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, लहान कार्यक्रमाला मी का आलोय? असे काहीजणांना वाटत असेल. पण, राज्य चालवायचे असेल व राज्याच भविष्य उत्तम घडवायचे असेल तर पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. मी स्वतः गेली ५२ वर्षे जनतेसाठी काम केले. चार वेळा मुख्यमंत्री झालो, केंद्रात मंत्री झालो. आता मला स्वतःसाठी काहीच नको आहे. प्रत्येक पुरुषाच्या कर्तत्वामध्ये महिलेचा हातभार असतो. जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तत्व घडविले. सावित्रीबाईंच्या विचारातून स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. रमाबाईंनी बाबासाहेबांना घडविले.

 कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषानी घेतला नाही. महिलाही त्यामध्ये कधीच मागे नाहीत. कर्तृत्वाला संधी दिली पाहिजे, असे म्हणत पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या कार्याचा गौरव म्हणून इथे आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.  जे लोक गेले त्यांची चिंता करायची नाही, गेले ते गेलेच असे म्हणत भाजपमध्ये गेलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता मत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रतापसिंह पाटील, जीवनराव गोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, संजय दुधगावकर,सुरेश पाटील, नंदकुमार गवारे आदीची पस्थिती होती. आभार नितीन बागल यांनी मानले. 

व्यासपीठावरून  फोन लावला

कृष्णा खोऱ्याचे पाणी उस्मानाबाद जिल्हयाला लवकर मिळावे यासाठी कांही वक्त्यांनी उल्लेख केल्यानंतर शरद पवार यांनी व्यासपीठावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना फोन करण्यास सांगितले. त्यांच्याकडून माहिती घेऊन पवार यांनी येत्या चार आठवड्यात या कामाचे टेंडर निघणार असल्याचे जाहीर केले. रशिया युक्रॉन युध्दात भारतातील कांही विद्यार्थी अडकल्यामुळे पवार यांनी चिंता व्यक्त केली. मी येणार , मी येणार फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत निवडणुकीअगोदरच मी येणार, असे म्हणत असल्यामुळे निवडणुक निकालानंतर पुर्णपणे खबरदारी घेतल्याचे पवार म्हणाले. 


कोरोना नंतरची पहिली सभा-मंत्री राजेश टोपे

गेली दोन वर्ष कोरोनाचा कहर सर्वत्र चालू होता. अशा बिकट परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. कोरोनाचा कहर संपल्यानंतरची उस्मानाबाद जिल्हयात पहिलीच मोठी सभा आहे. पवार साहेबांचे या जिल्हयावर विशेष लक्ष व प्रेम आहे, असे सांगून जिल्हयाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जे-जे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र निकषात बसतील त्या सर्वांना त्वरीत मान्यता देण्यात येईल, असे टोपेे यांनी जाहीर केले.


पवारांमुळे हा चमत्कार-धनंजय मुंडे 

निवडणुकीमध्ये मीच येणार, मीच येणार म्हणारे व ज्यांच्या पक्षाचे १०५ आमदार आलेत ते विरोधी पक्षनेते झालेत तर ज्यंाचे ६०आमदार ते मुख्यमंत्री झालेत. बाकी पक्षाचे मंत्री झालेत. हा चमत्कार केवळ पवार साहेबांमुळेच झाला, असे सांगून मुंडे यांनी केंद्र सरकारच्या यंत्रणेवर टीका करत, आजकाल ईडीची किंमत गणेश बीडी पेक्षा ही कमी झाल्याचे सांगत. यंत्रणेची खिल्ली उडवली. यावेळी संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती काय बालतो यांचे भान राखने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 


पुर्ण विद्यापीठ, रेल्वेमार्ग, मेडीकल कॉलेजला निधी दया- गोरे

यावेळी तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या १ हजार बंधाऱ्यांचे क्रेडीट शरद पवार यांना देऊन जीवनराव गोरे यांनी पवार यांच्यामुळेच आत्तापर्यंत जिल्हयाचा विकास झाला, असे सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर करने, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद रेल्वे मांर्गासाठी व मेडीकल काँलेजसाठी राज्य सरकारचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. 


पुर्ण ताकदतीने बँक निवडुन आणली-बिराजदार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली असतानाही उस्मानाबाद जिल्हा बँक पुर्ण ताकदीने निवडुन आणली असल्याचे संागत, २००३ साली झालेल्या घोटाळ्यामुळे व साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या कर्जामुळे बँक अडचणीत आहे. बँकेला मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पक्ष सोडणाऱ्यांना जनता कधी माफ करणार नाही, असे सांगत आज जमलेल्या प्रचंड लोकांची ताकद पवार साहेब आपण आहात याची जाणीव करून देणारी आहे. महाआघाडी सरकार मधील शिवसेनेचे आमदार-खासदार मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आणतात,विकास कामे करतात, राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमदारकीची निवडणुक लडविलेले राहुल मोटे, पैशापुढे पराभूत झाल्याचे सांगत राज्यस्तरावरील कांही कमिट्या लवकरच जाहीर होणार आहेत. त्यासाठी जिल्हयातील ज्येष्ठ नेत्यांचा विचार व्हावा, असे ही बिराजदार यांनी सांगितले. 

 
Top