उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतक-यांनी समृद्ध होण्यासाठी आर्थिक शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे.आर्थिक शिस्त म्हणजे  घेतलेल्या कर्जांची वेळेवर परतफेड करून आपले रेकॉर्ड छान ठेवणे असते. ही शिस्त पाळल्याने बॅका आपल्याला मोठे कर्ज देतात आणि या कर्जाच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी समृध होऊ शकतात, असे प्रतिपादन उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज येथे केले .

 येथील आकाशवाणी केंद्रासमोर ,परीमल मंगल कार्यालय येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हयातील शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी उत्पादन कपंनी, महिला बचत गट यांच्याकरीता  दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे,जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती दत्ता साळुंखे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर आदी उपस्थित होते.

  श्री. निंबाळकर म्हणाले,शेतकरी बांधवांनी पीक कर्जाबाबतही लक्ष देण्याची गरज आहे. अनेक शेतक-यांनी विमा कंपन्यांना नुकसान झाल्याची कल्पना दिली नव्हती म्हणून त्यांना विम्याची रक्क्म मिळाली नाही. त्यामुळे ऑनलाईन असो किंवा ऑफ़लाईन पद्धतीने असो विमा कंपन्यांना पीकांच्या नुकसानाची कल्पना देऊन त्याचे पंचनामे करून घेणे आवश्यक असते. शेतकरी पुर्वी उत्पादन वाढ, खते, कीटकनाशके यांचा वापर कसा करायचा हे शिकत होता ती त्या काळातील गरजही होती. परंतु आताचा काळ कृषी माल प्रक्रिया, बडिंग व मार्केटिंगचा आहे. यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. बदलत्या काळात शेतकऱ्यांनीसुद्धा बदलण्याची गरज असून त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी शिकावे आणि शेतीमध्ये सुधारणा करावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

 सरकारकडून अनेक योजना शेतक-यांसाठी राबविल्या जातात त्यामध्ये औजार बॅंक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना,  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत एक जिल्हा एक उत्पादन, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया असे अनेक योजना – उपक्रम गटांसाठी राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ शेतकरी आणि महिला गटांना मिळवून द्यावा. त्यासाठी योजनेची माहिती, तांत्रिक बाबी याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण, प्रचार – प्रसार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अशा प्रकारच्या कार्यशाळा आदींचे आयोजन नियमित करावे. योजनांचा शेवटच्या माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे कृषी अधिकार-यांना आवाहनही श्री. निंबाळकर यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी कृषी अधीक्षक आणि कृषी सहायकांनी शेतक-यांसाठी केलेल्या कामांचे कौतुकही केले.

 यावेळी जि.प अध्यक्ष श्रीमती कांबळे यांनीही शेतक-यांशी संवाध साधला त्या म्हणाल्या शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा अधिकाधिक वापर करणे काळाची गर्ज बनली आहे. यामुळे शेतीच्या उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते . आपला जिल्हा आत्मनिर्भर करण्यासाठी शेती व्यावसायाला चालना देणे महत्वाचे आहे.तसेच शेतीला स्मृद्ध करण्यासाठी शासनाच्या योजनांचा शेतक-यांनी लाभ घयावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 “राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी जनजागृती मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना,शेती व शेती पुरक व्यवसाय, बदलत्या हवामाना अनुकुल पिके, नाविण्यपूर्ण पिकांचे उत्पादन,शेतमाल विक्री व्यवस्थापन,निर्यातक्षम फळे आणि भाजीपाला उत्पादन अशा अनेक विषयांवर  कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेबरोबर याच ठिकाणी शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे आयोजनही करण्यात आले आहे.

 कार्यशाळेच्या प्रारंभी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या शेतकरी आणि कृषी विभागातील उत्कृष्ट काम केलेले अधिकारी तसेच कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री.तीर्थकर यांनी केले.सूत्रसंचालन निखिल रायकर यांनी तर कृषी उपसंचालक अभिमन्यु काशीद यांनी आभर मानले. या कार्यशाळेस जिल्हयातील शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी उत्पादन कपंनी, महिला बचत गट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top