तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील द्राक्ष विक्रीस नेतानाही अवकाळी पाऊस पिछा सोडत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदा अवकाळी पावसाला चांगलाच वैतागुन गेला आहे.तुळजापूर तालुक्यातील वातावरण निर्यातक्षम  द्राक्षासाठी दर्जदार वातावरण असुन येथे उत्तम दर्जाचे निर्यातक्षमा द्राक्ष पिकतात.तुळजापूर तालुक्यातील मसलाखुर्द परिसरातील जमीन दर्जदार  द्राक्ष पिकासाठी अतिशय पोषक आहे.

 मागील काही वर्षा पासुन आपसिंगा, काञी, कामठा,  सावरगाव  काटी, मसलाखुर्द आदी गावचे पंचक्रोषीत द्राक्ष उत्पादन वाढले आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी महापूर गारपीट  अशा अनेक नैसर्गिक आपत्तीतुन ही शेतकरी द्राक्ष उत्पादन करतो यंदा तर वर्षभरा पासुन अवकाळी पावसाने द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचा पिछा सोडला नाही याचा परिणाम उत्पादनात ४०%आसपास घट होवुन झाला.उत्त्पादन खर्च  यंदा मोठ्या प्रमाणावाढला  आहे.

सध्या तुळजापूर तालुक्यातील द्राक्ष परराज्यात विक्रीस जात असुन द्राक्षास ३५ रुपया पासुन ५० रुपये भाव मिळत आहे. तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा, कामठा, काञी पंचक्रोषीतील द्राक्ष छत्तीसगड ला जात आहे हे द्राक्ष नेताना अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्ष जातानासुध्दा अवकाळी पिछा सोडत नसल्याच्या प्रतिक्रिया द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांन मधुन केला जात आहे.


 
Top