उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद-तेर पळसप-मुरूड-लातूर हा राज्यमार्ग असून वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उस्मानाबादहुन लातूर, नांदेड, अमरावती जाण्यासाठी सर्वात कमी अंतर असलेला हा मार्ग असून पळसप गावातील साधारणत: ३०० ते ४०० मीटर रस्ता एकच वाहन जाणारा अरूंद रस्ता असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्यचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

सदर रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबीत असल्यामुळे रुंदीकरणाच्या कामाला गती मिळालेली नाही. तरी मंत्री महोदयांनी संबंधीत अधिकाऱ्यांना रस्ता रुंदीकरणासाठी आदेशीत करावे अशी मागणी केली आहे.

समुद्रवाणी- मेंढा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून सदर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक असून सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याने त्या परिसरातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे अशी ही मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे व तालुका सरचिटणीस अशोक शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यावेळी प्रदेश सचिव मा.आ. अमर राजुरकर, प्रदेश सचिव सुनिल चव्हाण, युवक प्रदेश सरचिटणीस अभिजीत चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड. धिरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, सचिव अॅड. जावेद काझी, तालुका अध्यक्ष रोहित पडवळ, जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, युवक तालुका अध्यक्ष अभिजीत कदम, बबनराव जाधव आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top