उस्मानाबाद / प्रतिनिधी

ज्यांचा आदर्श महाराष्ट्राने नव्हे तर जगाने घेतला असे राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज,भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम अशा महापुरुषचे नावे चौकाला दिली गेली आहे. यामुळे युवा पिढीला अशा महान पुरुषाच्या कार्याची माहिती मिळेल व त्यातून प्रेरणा मिळेल.त्याच्या जीवन कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन माजी मंत्री तथा तैलिक महासभेचे महासभा शाहू राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त आण्णा क्षिरसागर यांनी केले.

महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी असे प्रतिपादन आमदार कैलास पाटील यांनी केले.

राष्ट्रसंत जताजी व ए पी जे अब्दूल कलाम यांचे समाजासाठी व देशासाठी असणारे कार्य हे नविसरता येणारे आहे आणि अशा महापुरषांचे चौकाचे नामकरण आज उस्मानाबाद शहरात होण हे खुप मोठ काम आहे असे प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.

    उस्मानाबाद शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील व एलआयसी ऑफिसच्या बाजूने जाणाऱ्या चौकाचे राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज चौक असे नामकरण दि.६ रोजी माजी मंत्री तथा तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत अण्णा क्षीरसागर, खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.कैलास घाडगे-पाटील, महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभेचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, गुरुवर्य महादेव महाराज तांबे आळणीकर,तेली समाज जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ताज महल टॉकीज जवळील चौकाला भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम चौक असे नामकरण ही करण्यात आले. 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष विश्वास शिंदे,बाराबलुतेदार महासंघ राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे,कळंबचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार,उस्मानाबाद माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बंडगर,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव मसुद शेख,काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष खलिल सर,उस्मानाबाद तेली समाज जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, महादेव मेंगले, दत्ता बेगमपुरे,भिमाशंकर डोकडे,संतोष कलशेट्टी,नाना कानडे,अशोक चिंचकर,तेली समाज जिल्हाध्यक्ष बार्शी नागजी भाऊ मान्नजकर, बीड तेली समाज संघटनेचे नेते रामचंद्र गाताडे गुरुजी,तेली समाज संघटना लातूर विश्वनाथ खडके,जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळ उस्मानाबाद,लक्ष्मण माने,सरचिटणीस समता परिषद महाराष्ट्र राज्य,आबासाहेब खोत,जिल्हाध्यक्ष घिसाडी समाज उस्मानाबाद संजोग पवार,तुषार निंबाळकर,यांच्या प्रमुख उपस्थित यावेळी होती.

 
Top