उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंतिम फेरीमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रथम तर शिक्षण विभागाने द्वितीय क्रमांकाचे चषक पटकावले आहे.

 12 मार्च मार्चपासून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया लगत असलेल्या मैदानात या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत कर्मचारी यांचे एकूण 10 संघ सहभागी झाले होते. या दोन दिवशीय स्पर्धेमध्ये ओव्हर हॅट्रिक विजेता म्हणून सागर जाधव (शिक्षण विभाग), बेस्ट बॉलर समाधान संदीप डमरे (पं.स. परांडा), सलग तीन चौकार प्रकारांमध्ये. संजय आडे (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग), डॉ. गणेश चव्हाण (आरोग्य विभाग) रियाज शेख (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) सागर जाधव (शिक्षण) आणि नानासाहेब पवार (आरोग्य) यांनी आपली चमक दाखवली आहे. अर्धशतक मध्ये डॉ. गणेश चव्हाण (आरोग्य विभाग) आणि संजय आडे (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) यांनी विजेतेपद मिळवले आहे.

 13 मार्च रोजी अंतिम लढतींमध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग प्रथम तर शिक्षण विभाग द्वितीय पुरस्कार चषकाचा मानकरी ठरला आहे.  जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी.वाय.जाधव उपाध्यक्ष निलेश नायगावकर सचिव भाऊसाहेब गाडे, कोषाध्यक्ष दत्तात्रेय बुकन, मिलिंद प्रयाग सचिन देवगिरे,प्रदीप कुलकर्णी यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना सहभागी खेळाडूंना पारितोषक चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेदरम्यान जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा यांनी दोन्ही दिवस मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेतील सहशिक्षक सुनील मुंडे यांनी संयोजन सेनेच्या माध्यमातून स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


 
Top