उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

  उस्मानाबाद तालुक्यातील मौजे. जागजी येथे खा. ओमराजे निंबाळकर यांनी मंजूर केलेल्या कोट्यावधी रुपयाच्या कामाचा उध्दघाटन समारंभ खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी बोलताना मंजूर झालेली कामे करतांना ठेकेदारांनी कामाचा दर्जा सर्वोच्च प्रतीचा ठेवून कामे करावी तसेच कामांच्या दर्जाबाबत कसलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे मत खा. ओमराजे यांनी मांडले.

मौजे. जागजी येथे अंबाजोगाई- मुरुड-जागजी-समुद्रवानी-कनगरा रस्ता (रामा २११) किमी १०८/५८० ते किमी ११५/२०० (रू.२,१८,१९,२८४ रू.), मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जागजी ते जागजी तांडा रस्ता (किमी ०/००० ते १/२००) रू. ७३.८३ लक्ष, सुंभा शिव ते मुरुड शिव डांबरीकरण रू. २.५ कोटी, जागजी गावातील वॉर्ड क्रमांक-२ मध्ये दवाखान्याचा पाठीमागील सर्व रस्ते रू. ३५ लक्ष, ग्रामपंचायत इमारत नवीन बांधकाम रू.२० लक्ष, जागजी गाव ते जागजी तांडा डांबरीकरण रू.८९ लक्ष, तेर ते जागजी डांबरीकरण रू.४ कोटी ९२ लक्ष, RAP योजनेअंतर्गत कोरडवाहू शेतकऱ्यांना गुराढोरांचे वाटप आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जागजी येथे CCTV कॅमेरे बसविण्याच्या कामाचे उद्घाटन आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद, उस्मानाबाद सह पंचायत समिती, उस्मानाबाद आणि जिल्हा मध्यवर्ती बँक, उस्मानाबाद ची आजी - माजी संचालक, परिसरातील नागरिक शिवसैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधव आणि युवक मित्र उपस्थित होते.

 
Top