उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याला घरकूल उभारणीसाठी केंद्र सरकारने दिलेले उदिष्ट  विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे काम राज्यातील संबंधित यत्रणांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले आहे. यापुढेही विविध घरकूल योजनांबाबत प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत राज्यातील गरिबांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी काम करावी,असे निर्देश राज्याचे महसूल,ग्रामविकास बंदरे,खारजमिनी आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री अबदुल सत्तार यांनी आज केले.

राज्यमंत्री श्री.अब्दुल सत्तार यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे राज्यातील सर्व जिल्हयाची आढावा बैठक घेतली, तेव्हा ते बोलत होते,या रज्यस्तरीय बैठकीत त्यांनी महसूल विभागनिहाय आणि जिल्हानिहाय महसूल वसुली,गौण खनिज, प्रधानमंत्री आवास योजना घरकूल आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी येाजना (जि.प.अतंर्गत कामे) याबाबत आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता,अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे,जि.प.च्या जिल्हा ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक  श्रीमती पी.पी. शिंदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेद्रकुमार कांबळे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व  पाणी पुरवठा) अनंत  कुंभार,उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार (महसूल) प्रवीण पांडे आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत राज्यास दिलेले उदिष्ट विक्रमी मुदतीत साध्य केल्याबद्यल संबंधित यत्रणांच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचे कौतूक करून श्री.अब्दुल सत्तार यांनी विविध योजनांमध्ये बांधावयाच्या घरकूल योजनाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.च्या ग्रामविकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक, स्थानिक  पातळीवरील कर्मचाऱ्यांनी लक्ष घालावे, येणाऱ्या अडचणी दूर करण्यात या घरकूलांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे,घरबांधणीसाठी जागेचा प्रश्न येत असेल तर त्यात कोणते पर्याय आहेत,त्यांचा  शोध घेऊन शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करावी,असेही त्यांनी सांगितले.

एम आर ई जीएस ही योजना मंजुरांच्या हाताला काम देऊन त्यांना उदरनिर्वाहासाठी मदत करण्यासाठी आहे.त्यामुळे या योजनेत यंत्रांचा वापर करून किंवा इतर स्वरुपाच्या अनियमितता होणार नाहीत, यांची खबरदारी घेण्यात यावी, असे सांगून श्री.अब्दुल सत्तार यांनी पुढील काळात  मी राज्याचा दौरा करुन प्रत्येक विभागात जाऊन महसूल वसुली, गौण खनिज,प्रधानमंत्री आवास योजना आणि एम आर ई जीएसच्या कामाचा आढावा घेणार आहे.राज्यातील जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी महसूल वसुली, गौण खनिज वसुलीचे दिलेले उदिष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे.ते आपण कराल,असा मला विश्वास आहे,असेही ते म्हणाले

 
Top