उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागारे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आरेाग्य विषयक तपासणी,कार्यालयाची सजावट,उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण,गुणवंत पाल्य गौरव सोहळा आणि कोविड कालावधीमध्ये काम केल्याबाबत कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप, असे विविध उपक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगागवर यांच्या हस्ते दीप प्रज्जवलन  आणि सरस्वती पुजन करून करण्यात आले.या कार्यक्रमास जि.प.चे  मुख्य लेखा व वित्त अधिकारी  सुरेश केंद्रे, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन संदिपान इगे, जि.प.चे उपमुख्य लेखा वित्त अधिकारी सचिन कवठे, नगर परिषदेच्या मुख्य लेखापाल श्रीमती. एस.बी.जंपावाड,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, स्थानिक निधी लेखा कार्यालयाच्या सहायक संचालक श्रीमती अर्चना नरवडे, परिविक्षाधीन अधिकारी   सचिन सालकर आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य विषयक तपासणीचा 76 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लेखालिपिक  पूजा दळवे आणि  लेखालिपिक अनंता कानाडे यांनी केले. प्रस्ताविक व आभार अपर  कोषागार अधिकारी चंद्रशेखर काजळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कोषागार कार्यालयामधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी  विशेष परिश्रम घेतले.

 
Top