उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब शहरातील भारतीय स्टेट बँकेस क्रेडिट कार्ड धारक डॉ संयोगिता रामकृष्ण लोंढे यांना ६७५६७/- रू नुकसान भरपाई एक महिन्याच्या आत सव्याज देण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हा ग्राहक तक्रार न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे बॅंक ग्राहकांना दिलासा मिळाला असून बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात तक्रारदार डॉ संयोगिता रामकृष्ण लोंढे यांनी  मा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद यांच्याकडे बॅंकेच्या विरोधात  तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार क्रमांक २२४/२०२० दि ४/१२/२०२०.

सदरील प्रकरणी बॅंकेच्या सेवेतील त्रुटी, मा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाच्या निदर्शनास आणून दिल्या जसे की बॅंकेने न्यायोचीत व्यापार पद्धतीचा भंग केला, खातेदाराची गोपणीय माहिती खातेदाराच्या अनुमती शिवाय इतरांना कळविली, क्रेडिट कार्ड वितरीत करतांना फ्रॉड करण्यात आला, माहितीच्या अधिकारा अंतर्गत मागितलेली माहिती खातेदाराला पुरविली नाही, कोर्ट केस चालू असताना वारंवार अनुपस्थित राहुण न्याय दान प्रक्रियेस सहकार्य केले नाही ई. 

तक्रारदाराने सादर केलेले पुरावे, लेखी युक्तिवाद, विविध न्याय निवाडे, तोंडी युक्तिवाद ग्राह्य धरून ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने एकमताने मा अध्यक्ष श्री किशोर वडणे साहेब, श्री मुकुंद सस्ते ( सदस्य) आणि श्री शशांक क्षिरसागर (सदस्य) वरील निर्णय दिला.  तक्रारदारास मुळ रक्कम ५७५६७/-रू सव्याज+ ५०००/- रु मानसिक त्रासापोटी+ ५०००/-रू अर्जाच्या खर्चापोटी. देण्याचे आदेशात म्हटले आहे. 

तक्रार दाराच्या वतीने डॉ रामकृष्ण लोंढे यांनी बाजू मांडली तर बॅंकेच्या वतीने श्री अविनाश बाविकर यांनी युक्तिवाद केला. या निकालामुळे बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

 
Top