उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर करोडो रुपयांचा कर्जाचा डोंगर उभारलेल्या आणि भाजपवाशी झालेल्या नेत्यांनी बँकेचे कर्जापोटी फुटकी कवडीही आजवर भरलेली नाही.त्यांनी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकासाबाबत सहानुभूतीची तळमळ दाखवू नये असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवानेते पृथ्वीराज आंधळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

       उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंधरा संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवट तारखेपर्यंत (10 फेब्रुवारी 2022) महा विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता प्रयत्न झाले. मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्वतःच्या पाहुणेरावळे यांची थकबाकी बुडविणे च्या हेतूने बँकेवर निवडणूक लागली आहे. गेल्या 22 वर्षांपासून जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक लावून बँकेला पुन्हा आर्थिक अडचणीत येऊ न देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बिनविरोध निवडणुकीचे  प्रयत्न झाले. मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणूक व्हायलाच पाहिजे असा चंग बांधलेल्या आणि आप्त नातेवाईकांचे राजकारण करणाऱ्या भाजपाच्या तथाकथित नेत्यांनी जिल्हा बँकेविषयी कोणताही कळवळा न दाखवता आप्त नातेवाईक यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरून बँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी हातभार लावावा. असा टोला आणि आवाहन युवा नेते पृथ्वीराज आंधळे यांनी केले आहे.


 
Top