पाडोळी  / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील  टाकळी(बेंबळी) या गावात ग्रामपंचायत कडून विशेष करवसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे.ही वसुली उस्मानाबाद जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकार राहुल गुप्ता यांनी काढलेल्या परिपत्रका नुसार करण्यात येत आहे. 

ही विशेष करवसुली मोहीम ही 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2022 या पंधरा दिवसात करण्यात येत आहे.विषेश करवसुली मोहीम टाकळी (बें)सह  उस्मानाबाद तालुक्यातील  कारी,वाणेवाडी, मोहतरवाडी, राजुरी, खामगाव आदी गावात राबविण्यात येत आहे. तरी प्रत्येक गावातील सर्व ग्रामस्थांनी घरपट्टी, नळपट्टी भरून सहकार्य करावे,असे आव्हान ज्या त्या गावच्या सरपंच, ग्रामसेवक यांनी दिली आहे.

 

 
Top