तुळजापूर / प्रतिनिधी : - 

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने दिला जाणार गुणवंत शिक्षक पुरस्कार हा तुळजापूर तालुक्यातील किलज येथील भूमिपुत्र तथा स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय , हिप्परगा रवा येथील मुख्याध्यापक संजय बाबुराव भोयटे यांना उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर ,मराठवाड्याचे  शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  अस्मिता कांबळे,उपसंचालक गणपतराव मोरे,उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष टेकाळे, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मुकूंद डोंगरे यांच्या हस्ते मंगरूळ येथे प्रदान करण्यात आला.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

 
Top