उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गेल्या काही महिन्यांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले होते. परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा  मिळालेला नाही, शेतकऱ्यांना  पीकविमा मिळावा या मागणीसाठी मल्हार आर्मी,उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शुक्रवार दि. ७ जानेवारी रोजी  एकदिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले. हे उपोषण मल्हार आर्मी संस्थापक,अध्यक्ष सुर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या उपाषेण आंदोलनात मल्हार आर्मी मराठवाडा अध्यक्ष आण्णासाहेब बंडगर जिल्हाध्यक्ष नीलकंठ कोपन, जय हनुमान ग्रुप जिल्हाध्यक्ष, बालाजी वगैरे, िवद्यार्थी संघटना अध्यक्ष वैभव लकडे,उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष समाधान पडुळकर,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष  अशोक गाडेकर,उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष  विठ्ठल खटके,तुळजापूर तालुकाध्यक्ष  शहाजी हाक्के , प्राध्यापक मनोज डोलारे, प्राध्यापक सोमनाथ लांडगे ,डॉक्टर संतोष खटके पाटील ,महेश मोठे ,यांच्यासोबत रामकिशन खटके,धनंजय खटके,नारायण बंडगर आदींसही शेतकरी सहभागी झाले होते. 

 
Top