उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील शिवशंभुपंढरी वसाहतीत मराठी भाषा व संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान वतीने संस्थापक अध्यक्षा अर्चना अंबुरे यांच्या अनोख्या उपक्रमातून मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा १४ जानेवारी ते २८जानेवारी 

मराठी भाषा व संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेअंतर्गत मोबाईल पासुन दूर करण्यासाठी ,वाचन संस्कृती वाढावी,वाचनाची आवड लागावी यासाठी  ‘द आंत्रप्रेन्युअर’ या गाजलेल्या पुस्तकांच्या ५० प्रती या पुस्तकाचे लेखक  शरद तांदळे यांनी दिलेल्या आहेत. तरी आम्ही त्या पुस्तकाच्या प्रती विद्यार्थ्यांना वाटप करुन  गेली दोन वर्षे कोवीड महामारीमुळे शाळा जवळ जवळ बंदच आहेत त्यामुळे आम्ही हा उपक्रम त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी भाषेला सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेत आहोत. कारण एक बाई शिकली  घरातली तर पूर्ण घर शिकतं. सावित्रीबाईंनी दिलेला हा वारसा पुढे न्यायचा असेल तर मुलगी शिकली पाहिजे असे मनोगत या प्रसंगी अर्चना अंबुरे व्यक्त केले .  श्यामराव दहिटणकर , शेषनाथ वाघ, श्यामसुंदर भन्साळी, पुजा राठोड , सुरेश वाघमारे, पोलीस एकनाथ कुंडकर यांचे हस्ते विद्यार्थ्याना पुस्तके वाटप करण्यात आले . 


 
Top