उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 चोराखळी ता. कळंब येथील धाराशिव साखर कारखानास्थळी ऊसतोड मजुरांसाठी कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ही मोहिम राबविण्यात आली. यावेळी आरोग्य सेवक राजेश गुंजाळ, आरोग्य सेविका एस.ए.शिंदे, आशा कार्यकर्ती सविता कोकाटे, शंकुतला काळे, वर्षा मैंदाड, शेतकरी अधिकारी दयानंद घवाणे, एचआर ओमकार आवधुत, सुरक्षा अधिकारी शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.

 
Top