उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 इंडियन ऑइल कंपनी च्या वतीने ९ जानेवारीला उस्मानाबाद येथील राजलक्ष्मी पेट्रोल पंपावर ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

  ग्राहकांना पेट्रोल पंपा कडून मिळणाऱ्या सुविधा आणि ग्राहकांचे समाधान याविषयी उस्मानाबाद- सोलापूर जिल्ह्याचे विक्री समन्वयक जी.के.देशमुख यांनी संवाद साधला आणि ग्राहकांच्या शंका निरसन केले.दरवर्षी ९ जानेवारीला इंडियन ऑइल कंपनी च्या वतीने ग्राहक दिन साजरा केला जातो. उस्मानाबाद येथील राजलक्ष्मी पेट्रोल पंपावर पालकांसमवेत आलेल्या बच्चेकंपनीला चॉकलेट आणि भेटवस्तू देण्यात आली.

  इंडियन ऑइल कंपनी च्या वतीने सकाळी  ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ग्राहक सत्कार कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी इंडियन ऑईल कंपनीचे जिल्हा विक्री अधिकारी निशांत यादव, योगेश केंद्रे,लोकेन्द्र वर्मा यांची उपस्थिती होती राजलक्ष्मी पेट्रोल पंपाचे मालक रवी शेरखाने यांनी उपस्थित अधिकारी आणि ग्राहकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आणि आभार मानले.

 
Top