वाशी/ प्रतिनिधी-

श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी चे कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील श्री.संजय जालिंदर माळी यांना डॉ.बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाकडून इंग्रजी या विषयातून डॉक्टरेट (पी.एचडी) पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी इंग्रजी साहित्यातील “Irony of Justice in the selected Novels of Herman Melville, Charles Dickens and Franz Kafka” या विषयावर शोध निबंध सादर केला होता. 

या संशोधन कार्यासाठी प्रा.डॉ.अनिल कट्टे (इंग्रजी विभागप्रमुख) कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी चे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.

 
Top