उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील जिल्हा दिव्यांग निधी योजनेअंतर्गत 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांना शेळी-बोकडांचे वाटप करण्यात येणार आहे.यासाठी 31 डिसेंबर-2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील पात्र लाभार्थींचे परिपूर्ण  प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत जिल्हा परिषद  समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे  विहीत मुदतीत पाठवावयाचे आहेत.

 
Top