तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीरात श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा शनिवार दि.१८रोजी धार्मिक कार्यक्रम घेवुन पारंपरिक पध्दतीने पार पडला 

श्रीतुळजाभवानी मंदीरातील उपदेवता असलेल्या श्रीदत्त मंदीरातील ञिमुखी दत्त मुर्तीस सकाळी अभिषेक करण्यात आला नंतर दुपारी बारा वाजता जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी देविचे मंहत वाकोजीबुवा गुरुतुकोजीबुवा, मंहत हमरोजीबुवा,गुरुचिलोजीबुवा, सहाय्यक व्यवस्थापकधार्मिक नागेश शितोळे यांच्या हस्ते पुजाअर्चा करण्यात येवुन महाआरती करण्यात आली. नंतर मंदीरात भक्तांना लाडु प्रसाद वाटप करण्यात आला.

यावेळी मंदीर संस्थानचे  विश्वास परमेश्वर राजाभाऊ सावकार, नाना चोपदार, शशीकांत पाटील गायकवाड सह भक्त मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top