उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद आयोजित खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज गुरुवारी (दि.16) श्री तुळजाभवानी स्टेडियम येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड नितीन भोसले, जिल्हा न्यायाधीश मोहिते,जिल्हा न्यायाधीश जगताप, अँड मिलिंद पाटील, ॲड.रामभाऊ गरड, अँड अविनाशराव देशमुख, ॲड.साखरे,लोमटयांची प्रमुख उपस्थिती होती.

दिवंगत विधिज्ञाच्या स्मरणार्थ दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी जिल्हाभरातून 14 संघ सहभागी झाले आहेत. बाद पद्धतीने या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.


 
Top